Jalgaon news : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या तपास सुरू आहे. येथील सम्राट नगरात हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने सकाळी कामावर जाण्याची तयारी करून पत्नीला डबा बनवायला सांगितला.
असे असताना मात्र त्याने टोकाचा निर्णय घेतला. पत्नीने डबा केल्यानंतर पतीला बोलवायला गेल्या असता वरच्या मजल्यावरील खोलीत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिला दिसून आले. ते दृश्य बघून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला. वैशाली यांचा आवाज ऐकून शेजारील रहिवाशी धाऊन आले.
नंतर सुनील चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत अजून काही कारण समोर आले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी वैशाली आणि दोन मुलं असा परिवार आहे. सम्राट कॉलनीत सुनील मधूकर चौधरी पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत राहायला आहे. बोहरा गल्लीत हार्डवेअरच्या दुकानात ते कामाला होते.
दररोज सकाळी ते कामाच्या ठिकाणी जात होते. गुरुवारी सकळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सुनील चौधरी यांनी आपल्या पत्नी वैशाली यांना डबा बनवायला सांगितला. त्यानंतर ते वरच्या खोलीत गेले. यावेळी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.