IND vs AUS Match Result: रविवारी भारत आणि इंग्लंड (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकातील 5 वा सामना खेळला गेला. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 50 षटकांत केवळ 199 धावांवरच मर्यादित राहिला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघांची सुरुवात खराब झाली. 2 धावांच्या स्कोअरमध्ये भारताने 3 मोठे विकेट गमावले होते. मात्र विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला.
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. भारताने ऑस्ट्रेलियाला 200 पेक्षा कमी धावांवर रोखले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2 धावांत 3 विकेट्स घेत भारताला बॅकफूटवर ढकलले, परंतु भारताला देखील परत कसे लढायचे हे माहित आहे.
भारताचे दिग्गज फलंदाज इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले होते, तेव्हा या कठीण काळात विराट कोहली आणि केएल राहुल हे स्टार फलंदाज संघासाठी देवदूत ठरले, त्यांनी शहाणपणा दाखवत संयम ठेवला.
दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकी खेळी खेळली. विराटने 85 आणि केएल राहुलने 97 धावांची नाबाद मॅच विनिंग इनिंग खेळली. विश्वचषकात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची चांगलीच निराशा झाली.
भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर कांगारू फलंदाज फसताना दिसले. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण संघ केवळ 199 धावांत गडगडला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला मिचेल मार्श खाते न उघडता बुमराहच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.
डेव्हिड वॉर्नरने 41 धावांची तर स्टीव्ह स्मिथने 46 धावांची खेळी खेळली. या दोन खेळाडूंशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूने मोठी खेळी खेळली नाही. याचे संपूर्ण श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. ज्याने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा होता, ज्याने 3 बळी घेतले. तर कुलदीप-बुमराहने 2-2 आणि अश्विन, सिराज आणि पंड्याला 1-1 विकेट मिळाली.