राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. सत्तेत जाता येत असल्यामुळे अनेक आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे. पण काही आमदार अजूनही शरद पवारांसोबत आहे. तर काही आमदार यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेल्या नाही.
आता आणखी काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सामील होताना दिसत आहे. पण सध्या एका आमदाराचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. आमदार किरण लहामटे यांनी अजित पवारांच्या बंडानंतर तीन वेळा आपली भूमिका बदलली आहे.
किरण लहामटे हे अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला उपस्थित होते. पण त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली होती. आपण तटस्थ असल्याचे त्यांनी सांगितले होते. मतदार संघातील लोकांशी बोलून, चर्चा करुन आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले होते.
दोन दिवसांनी किरण लहामटे यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. पण आता त्यांनी सांगितले आहे की ते अजित पवार यांच्यासोबत आहे. मतदार संघाचा विकास आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे किरण लहामटे यांनी सांगितले आहे.
मी निर्णय घेण्यापूर्वी अजित पवारांनी मला न्यायला माणसं पाठवली होती. ते दोन-तीन दिवस माझा पाठलाग करत होते. त्यानंतर ती माणसं मला भेटली. त्यांनी अजित पवारांशी माझा संपर्क घडवून आणला, असे किरण लहामटे यांनी म्हटले आहे.
तसेच त्या दोन दिवसांत अजित पवारांनी माझ्या पत्नीलाही फोन केले होते. ते म्हणाले की, मी तुमच्या पतीला डांबून ठेवणार नाही. त्यांच्यांशी फक्त १५ मिनिटे चर्चा करेल आणि त्यांना त्यांचा निर्णय घेण्यास मोकळं करेल, असेही किरण लहामटे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांशी माझी देवगिरीवर चर्चा झाली. ते म्हणाले, २०१९ ला तुम्हाला तिकीट मी दिलं. तुमच्या रुग्णालयाचा, एमआयडीसीचा प्रश्न मी मिटवला. पुढे तुमच्या मेळावणे येथे बंधारा बांधायचा आहे त्यालाही तुम्हाला मी मदत करु शकतो. केंद्राकडून तुम्हाला मी मदत मिळवून देऊ शकतो. अजित पवारांनी हे सांगितल्यामुळे मला बरं वाटलं. मला माझ्या मतदार संघात विकास करायचा आहे. त्यामुळे मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे किरण लहामटे यांनी म्हटले आहे.