Heramb Kulkarni Attack: हेरंब कुलकर्णींवरील प्राणघातक हल्ला प्रकरणात ३ जणांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

Heramb Kulkarni Attack : अहमदनगर जिल्ह्यातून सीताराम सारडा येथे एक धक्कादायक माहिती समोर आली होती. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

काहीजण गाडीवरुन आले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत. या घटनेमागे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेजवळील पानटपरी हटविल्याच्या कारणातून हा हल्ला करण्यात आली आहे.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. हेरंब रामचंद्र कुलकर्णी महापालिकेत अर्ज केल्याने ती हटविण्यात आली. या रागातून आरोपींनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कारवाईसाठी संघटनांनी आवाज उठविल्यावर सोमवारी तपासाने वेग घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे प्रथम चैतन्य सुनिल सुडके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून इतरांची देखील माहिती घेण्यात आली.

विष्णु सब्बन याची सिताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. ती अतिक्रमणामध्ये येत असल्याने मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी पानटपरी काढण्यासाठी महानगरपालिकेत अर्ज दिला. त्यामुळे ती पानटपरी काढण्यात आलेली होती. याचा राग त्याला होता.