भीमाशंकरला जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात, ३५ जणांना घेऊन बस कोसळली दरीत

रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. १ जूलैला समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका बसचा भीषण अपघात झाला आहे.

कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाची ही बस थेट २० फुट खोल दरीत कोसळली आहे. हा अपघात पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यतील गिरवली या परिसरात झाला आहे.

या एसटी महामंडळाच्या बसमध्ये एकूण ३५ जण होते. त्यापैकी ५ जण जखमी झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर तातडीने प्रशासनाकडून मदत करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथून भीमाशंकर येथे ही एसटी महामंडळाची बस निघाली होती. ही बस जेव्हा गिरवलीच्या भागात होती. त्यावेळी अचानक बस चालकाच्या हातातून बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट २० फुट खोल दरीत जाऊन कोसळली.

हा अपघात भीषण होता, पण सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. यामध्ये पाच लोक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकही तातडीने मदतीला धावून आले होते. त्यानंतर लगेचच पाच रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या.

नागिरकांनी त्यांना त्या बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. तसेच घोडेगावच्या एका रुग्णालयात त्या जखमींना दाखल करुन उपचार दिले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. पोलिस याप्रकरणी तपास करणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.