Sangli News : कपडे धुण्यास गेले बाप-लेक, पाय घसरला अन् घडलं भयंकर, सांगलीत दुर्दैवी घटना

Sangli News : कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.

राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते.

दरम्यान, यावेळी ते पाय घसरुन पडले. तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.

नंतर त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. घटनेने मात्र खळबळ उडाली असून बाप- लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पाय घसरून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अजून काही सांगता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र बाप-लेकाच्या अचानक निधनाने संपूर्ण गावातून शोकाकूल आहे. घटनेची सध्या चर्चा सुरू झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.