मुलं लहान असताना आईवडिल त्यांना सांभाळत असतात. पण तिच मुलं मोठी होऊन आईवडिलांना सोडून जातात, अशा अनेक घटना सध्या समोर येत असतात. पण आता एका तरुणाने आईवडिलांनाच परदेशात नेऊन एक मुलगा कसा असावा याचा आदर्श उभा केला आहे.
कौतुकाने वाढवलेली मुलं अनेकदा नौकरीसाठी परदेशात निघून जातात. त्यामुळे आईवडिल एकटे पडत असतात. याची जाणीव अनेकदा मुलांना असते, पण ते आपल्या वडिलांना परदेशात नेण्यास टाळाटाळ करतात. पण अमेरिकेत स्थायिक झालेल्या राम बोडके नावाच्या एका तरुणाने आपल्या आईवडिलांनाही परदेशात नेले आहे.
विशेष म्हणजे त्याने आपल्या आईवडिलांना परदेशात नेताना त्यांचे जबरदस्त पद्धतीने स्वागत केले आहे. त्याचा व्हिडिओ राम बोडके यांनी शेअर केला होता. सोशल मीडियावर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच त्याचे मोठ्या प्रमाणात कौतूकही केले जात आहे.
सध्या राम बोडके यांनी शेअर केलेला व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसून येते त्याने आपल्या आईवडिलांना व्हिलचेअरवर बसून विमानतळापर्यंत आणले होते. त्यानंतर विमानाने प्रवास करुन त्यांना आपल्या अमेरिकेतील घरी आणले.
घरी आणल्यावर घरात प्रवेश घेण्याआधी त्यांच्या पत्नीने आईवडिलांची आरती सुद्धा केली. ज्या आईवडिलांनी आपल्याला कष्ट करुन वाढवलं, त्याच आईवडिलांचे आपल्या घरात स्वागत करण्याचे राम बोडके यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
मुलाला आनंदी बघून आणि त्याने आपले केलेले स्वागत बघून आईवडिलही प्रचंड खुश झाल्याचे दिसून येतात. मोठ्या कष्टाने वाढवलेल्या मुलाचे हे यश पाहून आईवडिलांनाही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून अनेकजण मुलाचे कौतूक करत आहे.