Nagpur Devi Mukhota : नागपुरात आईचा चमत्कार! खोदकाम सुरू असताना जमिनीतून निघाला देवीचा मुखवटा अन्…

Nagpur Devi Mukhota : सध्या नवरात्र उत्सव काही दिवसांवर आला आहे. हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. असे असताना नागपुरमध्ये एका भूखंडावर पाण्याच्या पाईपलाईनच्या खोदकामात देवीची दगडी मूर्ती सापडली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

ईश्वर मोहबे यांच्या मोकळ्या भूखंडावर नळासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना मजुराची कुदळ दगडावर आदळली. याठिकाणी देवीची दगडी मूर्ती दिसून आली. प्रथमदर्शनी ही प्राचीन मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

यामुळे याठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. याबाबतची माहिती काही मिनिटात सगळीकडे पसरली. यामुळे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यानंतर लोकांनी देवीच्या मुखवट्याची पूजा सुरू केली असून महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

तसेच याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी सध्या पुरातत्त्व विभागाकडून कोणी आलं नाही. त्यामुळे दगडाचा दिसत असलेला मुखोटा किती पुरातन आहे, याबद्दल प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असे असताना येथील नागरिक मंदिर बांधण्याची मागणी करत आहे.

सध्या याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहेत. जमिनीतून खोदकामादरम्यान निघालेल्या देवीचा मुखवटा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.