Husband Wife Fight : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे.
कविता सागर कुंभार (वय. २८ वर्ष, रा. पारवडी जाधववस्ती ता. बारामती ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती सागर मधुकर कुंभार याने फिर्याद दिली आहे. सागर आणि कविता यांच्यात घरगुती वाद होता. या वादातून कविताने पती सागर याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने उकळते गरम पाणी तोंडावर, छातीवर, पोटावर, गुप्त इंद्रिय जवळील भागावर टाकले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
तसेच आरोपी पत्नीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घुगे करत आहेत.
दरम्यान, बारामती तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पत्नी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. बारामतीच्या ग्रामीण भागात ही घटना घडल्याने चर्चा सुरू आहे.