Dream 11 : देशात सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. यामुळे यावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यामुळे ड्रीम इलेव्हन या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपले नशीब आजमावत आहेत. असे असताना या ड्रीम इलेव्हनमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळले आहे.
या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. यामुळे या अधिकाऱ्याचा आनंद गगनाला पोहोचला आहे. सोमनाथ झेंडे असे त्यांचे नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. झेंडे यांना क्रिकेटची आवड वेड आहे.
त्यांना गेल्या काही महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली.
त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ते खुश आहेत.
झेंडे यांना मिळालेल्या या यशामुळे कुटुंबात जल्लोष करण्यात आला. नीट अभ्यास करून खेळल्यामुळेच यश मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रमंडळीकडून आणि नातेवाईकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.
असे असले तरी ही गेम खेळताना डोकं लावून खेळण गरजेचे आहे. यामध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणावर पैसे बुडाले आहेत. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मोठी रक्कम एका तरुणाला मिळाली होती.