Nashik news : नाशिक येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना विनयनगर परिसरात घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पप्पांची सतत आठवण येते. पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ, आपणही पप्पांसारखे तारा होऊ आणि पप्पांबरोबरच तारा होऊन राहू. असे सात वर्षीय चिमुकलीने तिच्या मृत पित्याच्या आठवणी काढताना आईकडे व्यथा मांडली.
महिलेलाही पती नसल्याचे दुःख होते. दोघींच्या आयुष्यात आनंद नसताना जगण्यात खरंच अर्थ नाही,’ असे सुसाइड नोटमध्ये लिहून स्वत:सह मुलीचाही जीवनप्रवास कायमचा संपविला आहे. सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७) असे या मायलेकीचे नाव आहे.
त्यांनी आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिठ्ठीतून समोर आले आहे. या घटनेमुळे मात्र सगळेजण सुन्न झाले आहेत. सुजाता यांचे पती प्रवीण तेजाळे यांचा पाच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. अनयाला सातत्याने तिला पप्पांची आठवण येत असल्याचे सुजाता यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.
आईबापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवायही अर्थ नाही. अशा शब्दांत चिठ्ठी लिहीत त्यांनी चिमुकलीसोबत जीवनप्रवास संपविला. अनयाला येणारी पप्पांची आठवण अन् मला पतीचा विरह सहन होत नव्हता. यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सुरुवातीचे काही दिवस अनया शांत होती. मात्र, नंतर सतत तिला पप्पांची आठवण येत असल्याचे सुजाता यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे त्यांच्या राहत्या घरी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.