Mother Father End Life: घरात रोज वाद, मुलं रोज संपत्तीवरून भांडायचे, वैतातून आई वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय, घडलं भयंकर

Mother Father End Life: एका पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बिहारमधील मोतिहारी येथे ही घटना घडली आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

बिनोद कुमार चौधरी आणि त्यांची पत्नी किरण देवी बंकट मठिया गावातील रहिवासी होते. याशिवाय विनोद आणि किरण यांना प्रिन्स आणि निखिल ही दोन मुले आहेत. प्रिन्स विवाहित असून निखिल सध्या शिक्षण घेत आहे. त्यांच्यावर कर्ज देखील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रिन्स आणि निखिलमध्ये मालमत्तेवरून वाद होत होता. मुलांच्या रोजच्या भांडणातून पती-पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मुलगा म्हणाला की, तो कामानिमित्त चाकिया येथे गेला होता. त्यादरम्यान त्याला त्याच्या आई आणि वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजले.

कुटुंबातील इतर लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. असे असताना मात्र, वाटेतच आईचा मृत्यू झाला होता. दोन तासांनंतर वडिलांचाही मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली होती. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मृत बिनोद हे व्यवसायाने संवेदक होते आणि कर्जाचा बोजा होता असे सांगण्यात येत आहे. ज्याचा पोलिस तपास करत आहेत.