---Advertisement---

पुणे हादरलं! नवरा साखर झोपेत असताना बायकोचं भयानक कृत्य; गुपचूप जवळ गेली अन्…

---Advertisement---

पुण्यातील वारजे माळवाडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना त्याच्या पत्नीने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पत्नीने उकळते पाणी पतीच्या अंगावर टाकून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंगावर उकळते पाणी पडल्यामुळे पतीचे संपुर्ण अंग भाजले आहे. तसेच त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार केले जात आहे.

संबंधित घटना ही वारजे माळवाडीच्या शिवणे परीसरात घडली आहे. गुरुवारी पहाटे पत्नीने पतीवर उकळते पाणी टाकले होते. महादेव जाधव (वय ३०) असे त्या पतीचे नाव असून उकळत्या पाण्यामुळे पती जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. आता पोलिस याप्रकरणी तपास करत असूून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच तिची चौकशी केल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांनी पत्नीच्या भावाला काही रक्कम दिली होती. आता महादेव जाधवांना पैशांची अडचण आल्यामुळे त्यांनी मेहुण्याकडून पैसे परत मागितले. पण तो देत नव्हता.

त्यानंतर महादेव यांनी त्याबाबत पत्नीला सांगितले. मेहुण्याकडे सतत पैशाची मागणी करत असल्यामुळे त्यांची पत्नी खुपच संतापली होती. तिने याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने गुरुवारी पहाटेच्यावेळी पतीवर उकळते पाणी टाकले. या पाण्यामुळे महादेव गंभीर भाजले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---