Somnath Zende Suspended : Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या पिंपरीच्या PSI चं निलंबन, ‘ती’ एक चूक आली अंगलट…

Somnath Zende Suspended : काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले होते. यामुळे त्यांची चर्चा सगळीकडे सुरू होती. त्यांची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. आता या संबंधित मोठी माहिती समोर आली.

याप्रकरणी पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमनाथ झेंडे यांनी इंग्लंड-बांग्लादेश सामन्यादरम्यान ड्रीम-११ च्या ऑनलाइन गेममध्ये अव्वल क्रमांक मिळवून दीड कोटींचे बक्षीस जिंकले होते. सुरुवातीला झेंडे यांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, खात्यावर पैसे जमा होत असल्याने त्यांना खात्री पटली.

त्यांनी तातडीने ही आनंदाची बातमी कुटुंबियांना दिली. नंतर झेंडे यांनी दीड कोटींचे बक्षीस जिंकल्याची माहिती संपूर्ण राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी फोन करुन तसेच सोशल मीडियावरुन झेंडे यांचे अभिनंदन केले. झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर पाणी फेरणारी ठरली.

पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे त्यांना दीड कोटी जिंकणे, अंगलट आले आहे.