चांद्रयान मोहिमेत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी निभावलीये मोठी भूमिका, एक शास्त्रज्ञ तर दुसरा…

नुकतीच भारताची चांद्रयान ३ मोहिम पार पडली आहे. चांद्रयान ३ च्या लाँचिंगकडे फक्त भारताचेच नाही तर संपुर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. या चांद्रयान ३ ची मोहिमेची सुरुवात यशस्वी झाली आहे. या यानाचे उड्डाण यशस्वीपणे पार पडलेले आहे.

आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २३ ऑगस्टला याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या चांद्रयान ३ प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक शास्त्रांची चर्चा आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचाही सहभागी आहे.

या मोहिमेत जुन्नर तालुक्यातील दोन व्यक्तींचा सहभाग आहे. जुन्नर तालुक्यातील राजूरी गावचे सुपुत्र असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचा या मोहिमेत मोठा वाटा आहे. त्यामुळे या दोघांनी फक्त जुन्नरच नाही, तर संपुर्ण महराष्ट्राची मान उंचावली आहे. मयुरेश शेटे हे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे.

दहा दिवस चंद्रावर थांबून तेथील अभ्यास हे चांद्रयान करणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोहिम खुप महत्वाची आहे. पण ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्या अडणींवर मात करत शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ ची यशस्वीपणे उड्डाण करुन दाखवली आहे.

या चांद्रयानाचे प्रक्षेपण होत असताना कोणतीही चुकी झाल्यास मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ते टाळण्यासाठी अग्निशमक यंत्रणांची गरज असते. याचे सहा कोटींचे कॉन्ट्रॅक्ट असिफभाई महालदार यांच्या कंपनीला मिळाले होते. त्यांनीच श्रीहरीकोटा येथे ही यंत्रणा कार्यान्वित केली होती.

तसेच मयुरेश शेटे हे राजूरी गावातील विद्याविकास मंदिर शाळेचे माजी प्राचार्य केैलास शेटे यांचे सुपुत्र आहे. ते इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. त्यांचीही या मोहिमेत महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे या दोघांनीही महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे.