मुलं इंग्रजी शाळेत शिकावे, त्यांना परदेशात पाठवावं यासाठी पालक प्रयत्न करत असतात. तसेच अनेक पालक परदेशात पाठवू शकत नसले तरी ते आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात.
सरकारी शाळेत शिक्षक असलेले पालकही मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करत असतात. त्यामुळे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होताना दिसते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी पुरेसे मुलंही नसतात.
आता मात्र जालन्याच्या एका आयएएस दाम्पत्याने सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी त्यांचा मुलगा अथर्वला जिल्हा परिषजदेच्या शाळेत टाकले आहे.
विशेष म्हणजे वर्षा यांचे पती विकास मीना हे देखील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सीईओ आहे. सरकारी शाळेच्या अंगणवाडीत त्यांनी आपल्या मुलाला दाखल केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील अंगणावाडीतील दर्जेदार शिक्षणावर त्यांनी विश्वास ठेवत मुलाला अंगणवाडीत दाखल केले आहे.
खाजगी शाळेत, इंग्रजी शाळेत मुलांना पाठवण्याकडे पालकांचा कल आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक आपल्या मुलांना दाखल करत नाहीये. पण आता वर्षा मीना यांनीच आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत दाखल केल्यामुळे ग्रामीण भागात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनीच आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत दाखल केले आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतूक केले जात आहे. तसेच वर्षा मीना यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ग्रामीण भागातील पालकही आपल्या मुलांना त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करत आहे.