---Advertisement---

Pune News : पुण्यातील आजोबांना कॉलगर्लची भेट पडली महागात, ३० लाखांना लागला चुना, नेमकं काय झालं?

---Advertisement---

Pune News : पुण्यातून फसवणूकीची एक घटना समोर आली आहे. याठिकाणी पुणेकर आजोबांनी काही महिन्यांपूर्वी एका कॉल गर्लची भेट घेतली होती. असे असताना आता ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे महागात पडले आहे. यामुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

याप्रकरणी आजोबांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी ३ महिन्यात आजोबांकडून ३० लाख रुपये काढले. आजोबांनी देखील या प्रकरणी आपली बदनामी होईल, यामुळे पैसे काढून दिले. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शेवटी त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करुन घेतली आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास केला आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. या फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण सुरू झाले आहे.

असे असताना आजोबांना ज्योतीचा फोन आला. तिने सांगितलं की पोलिसांनी त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. तिच्या मोबाईलमध्ये तुमचे कॉल रेकॉर्डिंग आहे, अशी खोटी माहिती दिली. यामुळे आजोबा घाबरले.

पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी ज्योतीने आजोबांकडे पैशांची मागणी केली. भीतीपोटी आजोबांनी आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे अनेकदा ३० लाख ३० हजार रुपये दिले.

असे असताना आरोपींचे दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली. यामुळे अखेर त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले, यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---