IND vs NZ: मिचेलचे शतकच ठरले न्यूझीलंडच्या पराभवाचे कारण, सामन्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

IND vs NZ: भारतात क्रिकेटचा विश्वचषक सध्या सुरू आहे. यामध्ये भारताची जोरदार कामगिरी बघायला मिळत असून रविवारी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. यामध्ये भारताने विजय मिळवला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी जोरदार कामगिरी केली. शमीने आपल्या धारदार गोलंदाजीवर ५ विकेट्स घेतल्या. तसेच कोहलीने ९५ धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली.

असे असले तरी न्यूझीलंडला या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला तो त्यांचा खेळाडू डॅरिल मिशेलच्या शतकामुळे. मात्र हे कसे शक्य आहे, याबाबत तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. डॅरिल मिशेलने भारताविरुद्ध जोरदार कामगिरी करत शतक झळकावले.

त्याने १३० धावा केल्या. मिशेलने ९० चेंडूत ९३ धावा केल्या होत्या. असे असताना त्यानंतर त्याची गती कमी झाली. त्यानंतर खेळलेल्या ३७ चेंडूत ३७ धावा केल्या आणि केवळ ३ चौकार लगावले. हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. मिशेल सेट फलंदाज होता. त्याने शेवटी आक्रमक खेळी करायला हवी होती.

असे असताना सामन्यात उलटेच पाहायला मिळाले. मिशेलने शेवटपर्यंत फटकेबाजी केली असती तर या सामन्यात धावसंख्या ३०० च्या पुढे गेली असती. यामुळे भारतीय संघ अडचणीत आला असता, मात्र असे झाले नाही.

हा सामना टीम इंडियाने १२ चेंडू आणि ४ गडी शिल्लक असताना २७४ धावांचे लक्ष्य गाठले आणि विश्वचषकात विक्रमी विजय नोंदवला. सध्या या स्पर्धेत भारताने सलग विजय मिळवले आहेत.