Pune News : दसरा हा सण असल्याने झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. या दिवशी बाजार या फुलांनी गजबजून जातो. असे असताना मात्र यंदा शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली. आपल्या फुलांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक मोठ्या मार्केटला फुले विक्री करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून गेले होते.
असे असताना या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्याच्या फुलांना एकही रुपया मिळाला नाही. यामुळे अनेक शेतकरी निराश झाले आहेत. याबाबत एक भयानक वास्तव दसरा सणाच्या निमित्ताने समोर आले आहे. जालन्यातील विकास राजू वाघ हा युवक शेतकरी आपल्या घरच्यांसोबत झेंडूची फुले विकण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जालना येथून आला होता.
तो पुण्यातील मार्केट मार्ड येथे फुले विक्रीसाठी आला होता. मात्र येथे त्या फुलांची विक्री झाली नाही. नंतर त्याने वाशी मार्केटला जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी देखील तीच परिस्थिती होती. तेथे देखील त्याची फुल विकली गेली नाही.
शेतकरी त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. शिरूरजवळ आल्यानंतर त्याने गाडीतील जवळपास वीस पेक्षा अधिक फुलांचे क्रेट रस्त्त्यावर फेकून दिले. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती किती बिकट आहे, याचा अंदाज येईल.
याबाबत शेतकरी म्हणाला, आम्ही दोन दिवसांपासून काही खाल्ले देखील नाही. तीन दिवसांपासून झोपलो नाही, बाहेरून आयात करणार आणि आमच्या शेतकऱ्यांची त्यांनी माती करून टाकली, असे सांगितले.
आम्ही पुण्यातील आणि मुंबईतील मार्केट फिरलो पण आमच्या फुलला एकही रुपया मिळाला नाही. यामुळे शेतकरी हताश झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.