Lalit Patil Drugs Case : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. यामुळे आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे असताना आता याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका शैक्षणिक संस्थेचा प्रमुख विनय अर्हना याला बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. यामुळे खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
विनय अर्हनाचा ड्रायव्हर दत्ता डोके याला या प्रकरणात अटक झाली होती. दत्ताने ललित पाटीलला गाडीने मुंबईला सोडल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या प्रकरणात विनय अर्हना यालाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, रोझरी स्कूल या शैक्षणिक संस्थेचा संचालक विनय अर्हना याला ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्याचा ललित पाटीलशी संबंध आलेला होता. त्याठिकाणी त्यांची ओळख झाली होती.
ललित पाटीलने एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये दोन वर्षांपासून पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचे उत्पादन सुरू होते. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये याचा सप्लाय केला जात होता. ड्रग पेडलर्सच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. हे एक मोठं जाळ होतं. यातून ते दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते.