ही गोष्ट आहे 2006 सालची. डेव्हिड डिचफिल्ड हे एक बिल्डर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. ब्रिटन मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ सुरू होती. यातच त्यांचा रेल्वेत अपघात झाला.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अनुभवाबद्दल ते म्हणाले, मी माझ्या शरीरातून बाहेर पडलो होतो. मी रुग्णालयातील गजबजाटापासून दूर होतो. माझ्या शरीरात जाणवणाऱ्या भयानक वेदना संपल्या होत्या आणि मी एका शांत ठिकाणी उभा होतो.
तसेच ते म्हणाले, माझ्या सभोवताली प्रकाशाच्या तीन रेषा समान रीतीने पसरल्या होत्या. त्या रेषा तेजस्वी आणि प्रखर होत्या. मला त्या रेषा अतिशय पवित्र वाटल्या. मी त्या रेषांच्या माध्यमातून पाहू शकत होतो. माझ्या अवतीभोवती पसरलेला प्रकाश माझ्या शरीरातून आरपार जाऊन मला बरं करत होता.
माझ्या आयुष्यातील वेदनांचे स्तर एक एक करून कमी करत आहेत. माझ्या अंतरात्म्यापर्यंत ते पोहोचले होते. मला पहिल्यांदाच माझ्या संपूर्ण अस्तित्वाची जाणीव झाली, असेही त्यांनी सांगितले. प्रकाशाच्या एका मोठ्या बोगदयात देव पाहून मी भारावून गेलो होतो.
जेव्हा तुम्ही मृत्यू इतक्या जवळून पाहता, तेव्हा आलेला अनुभव इतका जबरदस्त असतो, तुम्हाला वास्तविकतेची होणारी जाणीव अत्यंत तीव्र असते. यामुळे तुम्ही वास्तविक जग वेगळ्या पद्धतीने पाहू लागता, असे म्हणत त्यांनी आपल्याला आलेल्या मृत्यूबद्दल वर्णन केले आहे.