बुलढाण्यातून नुकतीच धक्कादायक घटना समोर आली होती. राजूर घाटात ३५ वर्षीय महिलेवर ८ जणांनी मिळून बलात्कार केला होता. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
अशात याप्रकरणाचा पोलिस तपास करत असताना वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. पोलिसांनी राजूर घाटात जाऊनही तपास केला आहे. कारण महिलेने सांगितले होते की तिच्यावर राजूर घाटात बलात्कार झाला.
तसेच त्या महिलेने आठ जणांनी बलात्कार करुन आपल्याकडे असलेले पैसेही चोरी केल्याचे म्हटले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महिलेची संपुर्ण चौकशी करण्यात आली असता तिने आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यानंतर तिची मेडिकल टेस्ट करण्यात येणार होती. पण तिने बलात्कार झाला नसल्याचे सांगत मेडिकलला नकार दिला आहे. महिलेच्या या नकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
महिलेने अशी भूमिका का घेतली? तिच्यावर कोणी दबाव टाकला आहे का? ती महिला खरे बोलायला घाबरत आहे का? की त्या महिलेने बलात्काराचा बनाव केला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
संंबंधित घटना ही राजूरी घाटात घडली होती. एक महिला व तिचा नातेवाईक मित्र या घाटातून चालले होते. त्यावेळी ते फोटो काढण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी आठ जणांची टोळी आली आणि तिच्यावर बलात्कार करुन तिचे ४५ हजार रुपये घेऊन ते फरार झाले, असा आरोप त्या महिलेने केला होता.