अनेकदा पत्नीला अंधारात ठेवून विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात. असे असताना आता आपली ओळख लपवून एखाद्या महिलेला फसवून लग्न करणे तसंच तिच्याशी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबत मोदी सरकार कायदा करणार आहे.
भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असं करणं ही फसवणूक आहे. असे असताना आता या प्रकरणामध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा अहवाल तयार केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत विधिविषयक संसदीय समितीने अहवाल तयार केला आहे. याबाबत विधेयक आणले जाऊ शकते. यामध्ये एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली किंवा ओळख लपवून संबंध ठेवले तर तो बलात्कार नाही, तर ती फसवणूक होईल.
यामध्ये 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद करण्याची तयारी केली जात आहे. यामुळे लवकरच तो मंजुरीसाठी मांडला जाऊ शकतो. भारतीय न्यायिक संहिता विधेयकावरील स्थायी समितीचा मसुदा अहवाल शुक्रवारी मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, याबाबत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात लोकांनी आपलं आधी लग्न झाल्याचे लपवून दुसऱ्या महिलेशी लग्न केले आणि त्यानंतर त्या महिलांना शारिरीक छळ करण्यात आला. यामुळे या कायद्यामुळे यात वचक बसणार आहे.
दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली आणि संबंध ठेवले तर तो बलात्कार नाही, तर ती फसवणूक मानली जाईल. अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद केली आहे.