---Advertisement---

Pune news : रक्षक नव्हे राक्षस! पुण्यात पोलीसानेच तोडले अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ…

---Advertisement---

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरुन आलेल्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस हवालदारासह दोघांनी बलात्कार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार एका संस्थेच्या कार्यालयात घडला आहे.

आरोपींनी मुलीच्या प्रियकराकडून पैसे उकळून त्याला सोडून दिले. मात्र मुलीला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून ती छत्तीसगड राज्यातील बेमेतारा जिल्ह्यात कुटुंबासह राहते.

असे असताना तिचे मित्रासोबत प्रेम संबंध होते. दोघेही छत्तीसगडमधून पसार झाले होते. ते दोघे पुण्यात आले. यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या त्यांनी त्या दोघांना पोलिसांकडे नेले. त्याठिकाणी पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता.

अनिल पवार याने पीडित मुलीला व लिलीधर यांना बराच वेळ बसवून ठेवले. नंतर रेल्वे सुरक्षा दलाने तिला एका संस्थेत ठेवले. मात्र याठिकाणी वेगळेच घडले. याठिकाणी पोलीस हवालदार पवार आणि संस्थेतील कर्मचारी तिवारी यांनी मुलीवर बलात्कार केला.

याठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. नंतर रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी छत्तीसगड पोलिसांना याबाबत माहिती दिली छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या पालकांकडे दिले.

नंतर मुलीने याबाबत माहिती दिली असून पोलीस कर्मचाऱ्यांला अटक करण्यात आली असून याबाबत तपास सुरू आहे. अनिल पवारला निलंबित करण्यात आले असून, तो पसार झाला आहे. हवालदार पवार याचा शोध घेण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---