Dombivli news : खेळता खेळता घडला अनर्थ, 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, हाय प्रोफाईल सोसायटीतील घटना…

Dombivli news : डोंबिवलीमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. याठिकाणी एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. प्ले झोनमध्ये खेळताना पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पहिल्या मजल्यावरुन पडून या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. मुलांकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सक्षम हा कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे.

पहिल्या मजल्यावर असलेल्या प्ले झोनमध्ये खेळत असताना तो खाली पडला. इथल्या कामगारांनी सक्षमला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सक्षम उंडे असे मृत्यू झालेल्या चिमूरड्याचे नाव आहे. सक्षम हा भरत उंडे यांचा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. सक्षम हा कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. 

दरम्यान, अशा प्रकारे अनेक घटना घडत आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये खेळत असताना 12 वर्षाच्या मुलाचा सातव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला. याठिकाणी देखील याची चर्चा सुरू आहे.

अथर्व गावडे असे मृत्यूमुख पडलेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेंव्हा आई घरकामात करत होती. खेळताना अथर्व गॅलरीवर चढला आणि तोल जाऊन तो खाली पडला यात त्याचा मृत्यू झाला.