Maratha Reservation : मराठा आंदोलनासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या येवल्यातील सभेवेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीवर उभे असलेले काही कार्यकर्ते खाली कोसळले होते. ते जखमी झाले होते. त्यांच्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात येवल्यात जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकहून जरांगे पाटील हे येवला येथे गेले होते.
यावेळी त्यांच्या स्वागतावेळी जेसीबीतून पुष्पृष्टी करण्यात आली होती. यावेळी एका जेसीबीतून चार जण खाली पडले होते. या घटनेत ते चारही जण जखमी झाले होते. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचे निधन झाले आहे.
गोकुळ कदम असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या महिनाभरापासून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. येवला बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्यावेळी गर्दी झाल्याने जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला होता.
दरम्यान, जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली आले यावेळी जेसीबीवर असलेल्या बकेटमधून पुष्टवृष्टी करणारे चारही तरुण खाली कोसळले होते. यामध्ये ते जखमी झाले होते. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील अनेक ठिकाणी हजरी लावत होते. ते नाशिकमध्ये आले असताना ही दुर्दैवी घटना घडली होती. नंतर मनोज जरांगे पाटील यांनीही जखमी तरुणांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.