ठाकरे गटाचा ‘या’ तीन आमदारांना मोठा धक्का, आता आमदारकीच जाणार?

राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आताच मोठा धक्का बसला होता. आमदार नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहे.

आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळाच्या सचिवांना पत्र पाठवत मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि गोपीकिशन बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

ठाकरेंनी सचिवांना पत्र पाठवत ही मागणी केल्यामुळे तिन्ही आमदारांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे आता सचिव काय निर्णय घेणार यावर त्या तिन्ही आमदारांचे भविष्य ठरणार आहे. तिन्ही आमदारांनी शिंदेंसोबत जात ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. पण आता ठाकरेंनीही मोठी खेळी केली आहे.

ठाकरे गटाने ही नोटीस विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे दिली आहे. लवकरात लवकर या तिन्ही आमदारांवर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी ठाकरे गटाकडून सचिवांना करण्यात आली आहे. त्यामुळे सचिव यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

महिन्याभरापूर्वी मनिषा कायंदे यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु असलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे, असे म्हणत कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

तसेच नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे खरे नेतृत्व आहे म्हणत त्यांनी प्रवेश केला होता. मला हिंदुत्वाच्या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना द्यायची आहे, असे म्हणत नीलम गोऱ्हे या शिवसेनेत आल्या होत्या.