Buldana News : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच आरोपी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीही दिली होती.
या घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या शिक्षकावर पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकीही दिली होती. या घटनेनंतर ही मुलगी चांगलीच घाबरली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला.
दरम्यान, हा शिक्षक एवढेच करून थांबला नाही तर शिक्षकाने विद्यार्थीनेचे काही अक्षेपार्ह फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. याबाबत देखील माहिती समोर आली होती. याबाबत पोलिसांना तिने माहिती दिली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.
तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने तिच्यावर स्वतःच्या कारमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. कारमध्ये तिला बोलावून हे धक्कादायक कृत्य करत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. यामुळे आरोपी शिक्षकाला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत बुलढाणा पोलीस तपास सकरत आहेत.