---Advertisement---

Uber Driver Story : उबेर ड्रायव्हरने ‘ही’ ट्रिक वापरली अन् एका वर्षातच कमवले २३ लाख; वाचून चकीत व्हाल

---Advertisement---

Uber Driver Story : अमेरिकेत सध्या एका उबेर ड्रायव्हरही चर्चा सुरू आहे. येथील नॉर्थ कॅरोलिनातील एका ७० वर्षी उबेर ड्रायव्हरने एका वर्षात २३ लाखांची कमाई केली आहे. यामुळे त्याने नेमकं केलं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

येथील ७० वर्षीय बिल हे सहा वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झाले होते. त्यांनी पार्ट टाइम काम म्हणून ड्रायव्हिंगचे काम सुरु केले. यासाठी ते सरसकट कोणत्याही फेरीची विनंती स्वीकारत नव्हते. यामध्ये त्यांनी डोकं लावून काम केले तसेच यामध्ये देखील अभ्यास केला.

बिल ज्यावेळी फेऱ्यांची किमंत वाढते त्यावेळीच ड्रायव्हिंग करायचे. सुरुवातीला ते आठवड्याला ४० तास काम करत होते. नंतर त्यांनी ३० तास काम करणं सुरु केले. ते म्हणाले, जोपर्यंत किमती वाढत नाहीत तोपर्यंत वाट पाहायचो. करोनाच्या काळात काही ड्रायव्हर्स काम करत नसल्याने एका तासात ५० डॉलरची कमाई व्हायची.

दरम्यान, त्यांनी चांगल्या कमाईसाठी वेगवेगळी रणनीती वापरली. गर्दीच्या ठिकाणी विमानतळ आणि बारच्या बाहेर गर्दीच्या वेळांमध्ये थांबायचो. रात्री १० ते पहाटे अडीच या काळात मोठ्या प्रमाणावर किमती वाढायच्या. त्यावेळी मी काम केले.

ज्यावेळी एखादं विमान विमानतळावर उतरायचं त्यावेळी २० मिनिटांच्या फेरीचा दर १० ते २० डॉलरवरुन ४० ते ६० डॉलरपर्यंत जायचा, तेव्हा मी काम करायचो. यामुळे माझा फायदा होत गेला.

दरम्यान, एकदा त्यांनी दुर्गम भागातील एका ठिकाणी जाण्यासाठी बुकिंग केले होते. ते शहरापासून दोन तासांच्या अंतरावर होते. त्यासाठी त्यांना केवळ २७ डॉलर मिळाले होते, अशी देखील एक आठवण त्यांनी सांगितली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---