Mumbai news : सिंगापुरच्या तरुणाची मुंबईतील तरुणीसोबत मैत्री, भेट झाली अन् नंतर घडलं भयंकर, घटनेने सगळेच हादरले

Mumbai news : राज्यासह देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आता सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळविण्याच्या साईटवरून नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेसोबत मैत्री केली. पुढे मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सिंगापूर येथे राहणाऱ्या व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील महिला नवी मुंबईत राहण्यास असून तिची लग्न जुळवणाऱ्या साईटवरुन सिंगापूर येथे राहणाऱ्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती.

नंतर आरोपीने पीडित महिलेसोबत जवळीक वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपी व्यक्तीने पीडित महिलेला नवी मुंबई, मुंबई आणि सिंगापूर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

तसेच त्याने महिलेचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे या तरुणीला मोठा धक्का बसला आहे. तिने विश्वास ठेवून अनेकदा ती त्या तरुणाकडे भेटायला जात होती, मात्र तिचा विश्वासघात झाला असून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार करण्यात आला आहे.