‘चमत्कार सिद्ध करा, आम्ही चळवळ बंद करून 30 लाख देऊ’, अंनिसच्या आव्हानावर बागेश्वर बाबा म्हणाले…

बागेश्वर धाम बाबांना अंनिसच्या वतीने एक आवाहन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी त्यांचे चमत्कार सिद्ध करावेत, आम्ही आमच्या संघटनेचे काम थांबवू आणि त्यांच्या पायावर डोक्यावर ठेऊ, असे आव्हान अंनिसच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आले नाही, असे बागेश्वर धाम बाबांचे म्हणणे खोटे आहे. त्यांना रजिस्टर्ड पोस्टद्वारे आव्हान दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे. समितीने यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध जादुटोणाविरोधी कायदा व ‘द ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज’ कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात रितसर तक्रार करुन वकिलामार्फत नोटीसही बजावली आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे प्रवचनाच्या नावाखाली दरबार भरवतात आणि चमत्काराचा दावा करतात. त्यांनी त्यांचे चमत्कार फसवणूक मुक्त स्थितीत सिद्ध करावेत व अंनिसचे ३० लाखांचे बक्षीस मिळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी अंनिसचे मराठवाडा संघटक किशोर वाघ, जिल्हा संघटक पंकज देशमुख, सचिव रावसाहेब जारे हे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. ते म्हणाले, बाबांचे वर्तन हे सरळसरळ कायद्याचे उल्लंघन आहे व त्याविरुद्ध तक्रार दिलेली असताना त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यानंतरही बाबांची प्रवचने होतात, दरबार भरतो, यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

याबाबत नागपूर, मुंबई व इतर ठिकाणी रितसर तक्रार करुन वकिलामार्फत नोटीसही बजावली आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय पदवी घेतलेले डॉक्टर व केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाचे आयोजक होते, हेदेखील आश्चर्यच आहे, याकडेही पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले.