Akola News : नोकरीसाठी निवड झाली, कागदपत्रे आणायला गेला अन् वाटेत सगळं संपलं, कुटूंबाचा जीवघेणा आक्रोश

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी अकोट रस्त्यावर एक मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. यामुळे खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आनंद सुभाष खांदेल असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदला पुण्यात नोकरी लागली होती. तो अमरावतीला कॉलेजमधून डिग्री आणण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे. परतीच्या प्रवासात असतानाच गावाच्या शेजारीच ही दुर्घटना घडली.

यामुळे त्याचा नोकरीचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्याच्या आयुष्याचा प्रवास संपला. यामुळे त्याच्या कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदच्या मृत्यूची बातमी समजतात ‘माझा आनंद गेला’, असं म्हणत कुटूंबाने एकच टाहो फोडला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आनंद सुभाष खांदेल (वय २२) हा हुशार आणि होतकरू मुलगा होता. मोठ्या कष्टाने त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते. वडील शेती करीत असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा संपूर्ण भार असणार होता. तो लगेच कामाला देखील लागला यामुळे कुटूंबाला आनंद झाला होता.

अमरावती शहरातून नुकतेच त्याने इंजिनिअरिंग शाखेतून शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच झटक्यात पुण्यात नोकरीच्या मुलाखतीत त्याची निवड झाली होती. मात्र नोकरीवर जाण्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे. यामुळे सगळं काही संपलं आहे.

आनंद अमरावतीतील इंजिनिअर महाविद्यालयातून डिग्री आणण्यासाठी गेला होता, आणि सायंकाळच्या सुमारास डिग्री घेऊन परत गावाकडे येत असताना गावाच्या हाकेच्या अंतरावर आनंदसोबत ही दुर्दैवी घटना घडली. यातच त्याचे निधन झाले आहे.