वाईफ स्वॅपींगचे भयंकर रॅकेट पोलिसांनी केले उद्धवस्त, श्रीमंतांच्या बायका तरूण पोरांना..

चेन्नईतल्या ईस्ट कोस्ट भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी Wife Swapping ची पार्टी पोलिसांनी उधळली असून हे स्वॅपिंग चालवणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाची एका स्थानिकाने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर छापा मारत पोलिसांनी कारवाई केली. याठिकाणी असलेलं ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली सुरु असलेले वेश्या व्यवसायाचे रॅकेट उधळण्यात आले आहे. पोलिसांनी अचानक याठिकाणी धाड टाकली.

पोलिसांनी अटक केलेले आठ लोक चेन्नईतल्या बऱ्याच भागांमध्ये वाईफ स्वॅपिंग पार्टीजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होते. कोईंबतूर, मदुराई, सालेम या भागांमध्ये ‘वाईफ स्वॅपिंग’च्या पार्ट्यांच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरु होता.

पोलिसांनी आता या आठ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे आरोपी अविवाहित तरुणांना हेरत असत आणि त्यांची काही महिलांशी ओळख करुन देत असत.

तसेच वाईफ स्वॅपिंग पार्टीच्या नावे वेश्याव्यवसाय चालवत. तसेच पुरुषांकडून १३ ते २५ हजार रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करुन दिली जात असे. यानंतर पुढील प्रकार चालत असे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका महिलेच्या जाळ्यात तो पुरुष अडकला की त्याला इतर महिलांचे आमिषही दाखवले जात असे. दरम्यान, एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे वाईफ स्वॅपिंगच्या नावाखाली सुरु असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता.