Lalit Patil Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्स प्रकरण अटक केल्यानंतर ललित पाटील वैद्यकीय कारण देत पुण्यातील ससून रुग्णालयात राहत होता.
आई असताना मात्र त्याठिकाणी तो फुकटात राहत नव्हता. त्यासाठी तो मोठी रक्क मोजत होता. ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील दर महिना 17 लाख रुपये मोजत होता. पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तो एवढी मोठी रक्कम ससून रुग्णालयात नेमकी कुणाला देत होता? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे आता याबाबत अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच तो ससून रुग्णालयात असताना अनेक मॉल्स देखील फिरला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ललित पाटील आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. आता खरेदी केलेल्या प्लॉट तसेच फ्लॅटची माहिती पुणे पोलिसांच्या हाती आली आहे.
तसेच त्याच्या लाखो रुपयांच्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामध्ये फॉर्च्युनरसह 3 कारचा समावेश आहे. ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून खरेदी केलेल्या प्लॉट तसेच फ्लॅटची माहिती पुणे पोलिसांच्या हाती आली आहे.
त्याने स्वतःच्या नावे, कुटुंबियांच्या नावे, प्रेयसीच्या नावावर नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामुळे आता पोलिस याची माहिती काढत आहेत. दरम्यान, यामध्ये त्याच मोठं जाळ समोर आलं आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत.