---Advertisement---

Pune crime : पुण्यात तरुणाला नग्न नाचवून व्हिडिओ केला व्हायरल, कपडे काढले अन्…

---Advertisement---

Pune crime : पुणे शहरात एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी युवकाला नग्न नाचायला लावून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची घटना पुण्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे खळबळ उडाली.

याबाबत तरुणाला खोटं सांगून बोलावून घेतले. फ्लॅटवर तुझा भाऊ आला आहे. त्यानंतर तरुणाला नग्न नाचायला लावून त्याचा अश्लील व्हिडीओ शूट केला. तसेच तो गावाकडील व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरलही केला आहे.

तसेच आरोपींनी पीडित तरुणाकडून जबरदस्तीने ६० हजार रुपये काढून घेतल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. फिर्यादीचा मोबाईल फोन देखील जाळून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले (सर्व रा. येरवडा, मूळ साई सेवा तिसगाव, प्रवरा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून तुझा भाऊ फ्लॅटवर आला आहे असे सांगून बोलावून घेतले. यामुळे फिर्यादी लगेच याठिकाणी आला. यानंतर फिर्यादी यांना कपडे काढून नाचायला लावले. त्याचा नग्न व्हिडीओ काढला. नंतर फिर्यादीचा मोबाईल जाळून टाकला.

याबाबत ३३ वर्षीय तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी सोमनाथ राजभोज, चंद्रकांत लांडगे हे एकाच गावाचे आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---