भल्यामोठ्या खिंडारानंतर ठाकरेंना विधीमंडळात सर्वात मोठा धक्का; आता मित्रपक्ष काॅंग्रेसच…

राज्यात सध्या शिवसेनेचे दोन गट पडलेले आहे. एक गट उद्धव ठाकरेंचा आहे तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांचा आहे. पण गेल्या काही महिन्यात ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहे. आठवड्याभरापूर्वी विधानपरिषदेच्या आमदार नीलम गोऱ्हे या सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्या आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गट खुप आक्रमक झाला आहे. त्यांनी नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. पण ठाकरे गटाच्या या मागणीनंतर सत्ताधारी नेत्यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाचं संख्याबळ कमी आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनाही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे अंबादास दानवेंवरच आता कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी ठाकरे गटाने केली. पण भाजपनं आता ठाकरेंच्या विरोधी पक्षनेत्यावरच आक्षेप घेतला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेतेपदाचा नैतिक अधिकार नाही. कारण ठाकरे गटाकडे आता पुरेसे संख्याबळ नाहीये, असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांनाच परावरुन हटावे लागणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत एकूण ७८ आमदार असतात. त्यापैकी २१ आमदारांची संख्या अजूनही रिक्त आहे. सध्या सत्ताधारी पक्षाचे ३० आमदार आहेत, तर महाविकास आघाडीचे २१ आमदार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचे ९, ठाकरे गटाचे ८ आणि शरद पवार गटाचे ४, तर इतर ६ आमदार आहे. आधी शिवसेनेकडे जास्त आमदार होते, पण आता त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे.