---Advertisement---

Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन…

---Advertisement---

Tejashri Pradhan : ‘ती सध्या काय करते’ फ्रेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन झाले आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा प्रधान या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या.

अशातच आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे आता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे तेजश्रीला मोठे दुःख झाले आहे. सध्या तेजश्रीच्या आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

तेजश्री आणि तिच्या आईमध्ये खूप छान नातं होतं. तेजश्रीने याबाबत अनेकदा सांगितले आहे. तिच्यासोबत तिची आई नेहेमी असायची. अग्गबाई सासूबाई तेजश्रीची भूमिका तिच्या आईला फार आवडली होती.

तसेच तिची आई प्रत्येक चित्रीकरणाला तेजश्रीच्या सोबत जायच्या. हिरॉईनची आई म्हणून नाही पण एका कोपऱ्यात जाऊन त्या निवांतपणे बसलेल्या असायच्या. यामुळे त्या सर्वांना परिचय होत्या. सर्वांसोबत त्या छान गप्पा मारत असायच्या. तेजश्रीला त्यांनी खूप पाठिंबा दिला.

दरम्यान, तेजश्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रचंड यश मिळवले. ती प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली. तिचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तेजश्रीने नुकतेच काही फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

असे असताना मात्र आता ऐन दिवाळीत तिला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे. आईच्या निधनानंतर तेजश्री खचून गेली आहे. सध्या अनेकांची तिची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तिच्यावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर उभा राहिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---