Jalgaon news : भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती बहीण, प्रवासातच घडला अनर्थ, बहिणीचा एकच आक्रोश…

Jalgaon news : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. असे असताना तरुणावर काळाने झडप घातली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. विजय शाम सोनी हे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. ते जळगावातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते.

दिवाळीत ते कल्याण येथील मामांकडे गेले होते. नंतर ते कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे भाऊबिजेला जाण्यासाठी रेल्वेने प्रवासाला निघाले. मात्र यावेळी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासात जळगाव ते शिरसोली दरम्यान विजय सोनी हे धावत्या रेल्वेतून बाहेर पडले.

त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हलविले. तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. सोबत असलेल्या मोबाईल तसेच कागदपत्रावरुन मयत हे विजय सोनी असल्याची ओळख पटली आहे. पोलिसांनी मोबाईल मधील संपर्क क्रमाकांवर कॉल करुन घटनेची माहिती दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुटूंबीय याठिकाणी दाखल झाले. कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून प्रचंड आक्रोश केला. सोबत असलेल्या मोबाईलच्या आधारावर या शिक्षकाची ओळख पटली. या भावाचे मात्र भाऊबीज अपूर्णच राहिले आहे.

भावाविना भाऊबीजच्या विचाराने विजय सोनी यांच्या बहिणीने प्रचंड आक्रोश केला. कुटुंबियांचा आक्रोश पाहून इतर सर्वच आक्रोश करत होते. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.