Mitchell Marsh : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले.
यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. भारताला प्रथम फलंदाजी करताना केवळ २४१ धावा झाल्या. यामुळे परिस्थिती बिकट झाली.
असे असताना ऑस्ट्रेलियाने विजयानंतर मोठा जल्लोष केला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एक असा फोटो आहे की ते पाहून सगळेच थक्क झाले.
या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेल मार्श वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर खूप टीका होत आहे. अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मिचेल मार्शचा हा व्हायरल झालेला फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मार्शने तो फोटो रिपोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मार्शच्या पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला.
यामुळे आता या फोटोवरून वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोहितने कर्णधार म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले, रेकॉर्डचा उंबरठा पाहिलं नाही धावांची भूक गड्याने शेवटच्या सामन्यापर्यंत सेल्फलेस बॅटींग केली. मात्र त्याला अंतिम सामना जिंकता आला नाही. भारतीय संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच ऑल आऊट झाला.
सुरुवातीला तीन विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांना त्यानंतर यश मिळवता आलं नाही. त्यामुळे भारताच्या हातून सामना निसटला. तीन विकेट गेल्यावर भारत हा सामना जिंकेल, असे अनेकांना वाटत होतं, पण निराशा झाली.