वर्ल्डकपमधील पराभवानंतर ‘या’ २ खेळाडूंना मिळणार डच्चू? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत….

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले. टीम इंडियाने सगळे सामने जिंकले मात्र अंतिम सामना त्यांना जिंकता आला नाही. २०१३ पासून भारताने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही.

आता या पराभवानंतर संघातील २ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिले नाव घेतले जात आहे ते म्हणजे सूर्यकुमार यादवचे. टी-२० मध्ये जबरदस्त फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय प्रकारात पुन्हा अपयशी ठरला.

वर्ल्डकपमध्येही सूर्याला समाधानकारक फलंदाजी करता आलेली नाही. त्याला क्वचितच फटकेबाजीची संधी मिळाली. पण त्यातही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे त्याला आता बाहेर बसवण्याची शक्यता आहे.

त्याने ७ सामन्यांत १७ च्या सरासरीने १०६ धावा केल्या. तसेच रविचंद्रन अश्विनचे वाढतं वय लक्षात घेता बीसीसीआय त्याला शिखर धवनप्रमाणे एकदिवसीय संघातून डच्चू देऊ शकते. त्याला केवळ एकाच सामन्यात खेळवण्यात आले.

दरम्यान, भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंना घेऊन खेळला. दोघांची कामगिरी उत्तम झाली. त्यांनी वेगवान गोलंदाजांना चांगली साथ दिली. मात्र अंतिम सामन्यात तशी जादू दिसली नाही. यामुळे चाहते निराश झाले.

दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांमधील भारताच्या अपयशाची मालिका कायम राहिली. यामुळे पुन्हा नव्याने टीम बांधावी लागणार आहे.