IND vs AUS T-20 Series : वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर टी२० मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताला विश्वचषकमध्ये कांगारूंकडून निराशाजनक ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
यामुळे आता याचा बदल घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज असणार आहे. यात कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाटा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारी टी-२० मालिका विझाग, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद या पाच ठिकाणी होणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला २३ नोव्हेंबर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरुवात होईल.
दरम्यान, बीसीसीआयने मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार याचा समावेश आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा, यांचा समावेश आहे.
दरम्यान, टी-२० मालिका स्पोर्ट्स १८ आणि कलर्स सिनेप्लेक्सवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तसेच JioCinema अॅप आणि वेबसाइटवर सामन्याच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजल्यापासून उपलब्ध असेल. या मालिकेत अनेकांना विश्रांती देण्यात आली आहे.