Mumbai news : मुंबईत भयंकर घटना! लग्नाचे कपडे ठेवण्यासाठी घेतलेल्या बॅगेत प्रेयसी तुकडे, मृतदेह भरला अन्..

Mumbai news : संशयाचे भूत डोक्यात शिरले आणि सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात भंगले. एक धक्कादायक घटना सध्या मुंबईत घडली आहे. कुर्ला मेट्रो स्टेशन येथे एक निळ्या रंगाची बेवारस बॅग आढळून आली. नंतर पोलिसांची एक टीम स्पॉटवर‌ पोहोचली.

पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. पोलिसांना ती बॅग उघडताच धक्का बसला. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात असणारा मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सगळे CCTV तपासले. तसेच अनेक ठिकाणी चौकशी देखील केली. नंतर पोलिसांना काहीसा सुगावा लागला. त्यांनी थेट गाठलं ठाणे रेल्वे स्टेशन. त्याठिकाणी आरोपी ओडिसाला जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

२२ वर्षाच्या अस्कर मनोज बरला याने प्रेयसीची हत्या केली होती. ते दोघे धारावीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते पण डोक्यात संशय शिरल्याने हत्या केल्याचे उघड झाले. बॅगेत त्याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह भरला. 

म्हणतात ना संशयाची कीड एकदा लागली की त्याची माती झाली म्हणून समजा. असेच काहीसे त्यांच्या बाबतीत घडले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांकडे कोणताही सुगावा नव्हता मात्र पोलिसांनी 8 टीम तयार केल्या. त्यानुसार तपास केला. पोलिसाने खाक्या दाखवताच आरोपीने सगळी खरी खरी माहिती पोलिसांना दिली. यामुळे तपास लवकर पूर्ण झाला.