“किरीट सोमय्यांनी ‘तो’ व्हिडिओ खरा असल्याचे केलं मान्य? महीलेशी जबरदस्ती संबंध…”

सोमवारी रात्री एका मराठी वृत्तवाहिनीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्यानंतर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.

विधीमंडळातही किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओवर चर्चा झाली आहे. या व्हिडिओवरुन विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब हे सुद्धा यावेळी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना दिसून आले.

या व्हिडिओतील महिलेला शोधणं तुमचं काम आहे. ज्या महिलेने व्हिडिओ पाठवला त्याबद्दल महाराष्ट्राला कळलंच पाहिजे. ही विकृती खुपच भयंकर आहे. आतापर्यंत पैशांची खंडणी ऐकली होती, पण ही शारिरीक संबंधांसाठीची खंडणी आहे का? असा प्रश्न पडतोय, हे प्रकरण फार गंभीर आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

आठ तासांचे व्हिडिओ मिळाले आहेत. गृहमंत्री एसआयटी लावणार का? हे त्यांनी जाहीर करावं. सोमय्यांनी फडणवीसांना पत्र लिहीले आहे. त्यामध्ये तो व्हिडिओ माझा नाही असे ते बोलले नाही. त्यांनी मी महिलांवर अत्याचार केला नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे हे त्यांनी मान्य केलंय का? असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

तसेच व्हिडिओमध्ये फक्त किरीट सोमय्या हे दिसून येत आहे. व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूला कोण होतं? हा व्हिडिओ कोणी घेतला? ते सर्व बाहेर आलं पाहिजे. महिलेशी जबरदस्ती संबंध बनवण्याचा प्रयत्न होतोय का? हेही बाहेर आलं पाहिजे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेले नाही. त्यामुळे माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करावी, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.