शुक्रवारी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूबद्दलची बातमी समोर आली होती. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. मराठी कलाकारांनी त्यांच्या अंतिम संस्काराला हजेरी लावली होती. तर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीने त्यांना अग्नी दिला होता.
प्रवीण तरडेसह काही कलाकार गश्मीर महाजनीला धीर देत होते. तर मृण्मयी देशपांडे सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित होती. यावेळी रवींद्र महाजनी यांचे संपुर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी त्यांच्या पत्नी माधवी महाजनीही खुप भावूक झाल्या होत्या.
रवींद्र महाजनी यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्य होती. गश्मीर हा सध्या अभिनय क्षेत्रात आहे, तर त्यांची मुलगी रश्मी ही बेंगलोरला स्थायिक झाली आहे. गश्मीर आणि रश्मीमध्ये १३ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे गश्मीरसाठी ती दुसरी आईच होती.
लहानपणापासून तिनेच गश्मीरची काळजी घेतली आहे. त्यांचे संबंधही खुप खास होते. तो आपल्या बहिणीला दुसरी आईच मानत होता. तसेच तिने त्याची आतापर्यंत किती काळजी घेतली आहे. याबाबत गश्मीर अनेकदा व्यक्तही होताना दिसून आला आहे.
रक्षाबंधणाच्या दिवशी त्याने रश्मीसाठी एक खास पोस्ट केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की माझी बहिण १३ वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी आहे. ती छोटी आईच आहे. केजीपासून पाचवीपर्यंत ती माझा डब्बा भरुन द्यायची.
तसेच पुढे तो म्हणाला होता की, मला शाळेसाठी तयार होण्यासाठीही माझी बहिण मला खुप मदत करायची. ती मला तिच्या कायनेटिक होंडावरुन शाळेत सोडवायला यायची. हिरो होण्यासाठी मला चित्रपटसृष्टीत येण्याची गरज नव्हती. मी तिच्यासाठी आधीपासूनच स्टार होतो. असा हा बाँड दोन्ही भावा-बहिणीचा आहे.