Lalit patil : तो कर्मचारी सापडलाच! ललित पाटील प्रकरणी मोठी माहिती समोर, कर्मचाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक केले आहे.

याबाबत आता चौकशी केली जात आहे. ललित पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याला अनेक गोष्टींची मदत करण्यामध्ये या कर्मचाऱ्याचा हात होता. तसेच तो सतत ललित पाटीलच्या संपर्कात होता. अशी माहिती देखील समोर आली आहे.

महेंद्र शेवते असे या अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे नाव असून, तो शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता. त्याने अनेकदा ललित पाटीलला मदत केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यावर शेवतेला अटक करण्यात आली आहे. यामुळे त्याच्याकडून अजून काही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.

शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, १६ नंबर वॉर्ड मधील कैदी आणि ससुनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता. १६ नंबर वॉर्डमधे तो सतत ये जा करत होता. यावेळी तो पाटीलशी संपर्क साधत होता.

१६ नंबर वॉर्डमधे काम करणाऱ्या १० ते १२ नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शेवतेच्या चौकशीतून तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे समोर येणार आहे.