Maharashtra Rain : राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीचा इशारा, जाणून घ्या..

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. असे असताना अनेक ठिकाणी राज्यात गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत असून गारपीट होण्याची शक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. 

यामध्ये येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी ही बातमी आहे.

दरम्यान, यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल देखील याठिकाणी गारपीट झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत जाण्याची शक्यता आहे.