Raigad News: कोकण रेल्वे खाली उडी मारून महिलेची मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ही घटना आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली.
याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉइस मेसेज पाठवला होता. यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
घटनेनंतर दोघींचेही मृतदेह हाती लागले आहेत. तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मैत्रिणीने लगेचच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलीस तत्काळ याठिकाणी धाव घेतली.
याठिकाणी महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांनी स्थानिकांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे. या ठिकाणी पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत. याबाबत अजून कोणालाही ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले जात आहे.
महिलेने आत्महत्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला व्हॉइसमेसेज पाठवला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते. यामुळे याचे कारण समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी तसा तपास सुरू केला आहे. मात्र घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. घटनेनंतर लगेचच याबाबत सर्वांना माहीती झाल्यामुळे याठिकाणी गर्दी झाली होती. यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.