उसाची तोड सुरू असताना सापडलं गोड पिल्लू, पोरांनी खेळवत घरी आणलं अन् सगळ्यांना धक्काच बसला…

धुळे तालुक्यातील नाणे सिताने गावाततून एक बातमी समोर आली आहे. याठिकाणी ऊस तोडणीला सुरवात झाली असून एक शेतकरी शेतात ऊस काढणी करीत असताना त्यांनी मांजरीची पिल्ले समजून बिबट्याची पिल्ले घरी आणल्याचा धक्कादायक समोर आला. याबाबत माहिती मिळताच सळगेच हादरले होते.

ही घटना धुळे तालुक्यातील नाणे सिताने या गावात घडला आहे. येथील शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतात ऊस तोडणी करीत असताना मजुरांना २ पिल्ले आढळून आली. मात्र ती कशाची आहेत, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती.

या पिल्लांना घेऊन ते काशिनाथ माळी यांच्या शेतातील शेडमध्ये घेऊन आले. या पिल्लाबरोबर या मजुरांची मुले काही वेळ खेळली देखील, मात्र शेतमालक काशिनाथ माळी हे सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना ही बिबट्याची पिल्ले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे मोठी भीती निर्माण झाली.

त्यांनी याबाबत वनविभागाला तात्काळ यासंदर्भात माहिती दिली. वनविभागाने लगेच घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणी बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी कॅमेरा लावून लक्ष ठेवले.

नंतर काही तासात बिबट्या मादी पिल्लांजवळ आली आणि काही काळ पिल्लांसोबत घालवल्यानंतर ही मादी त्या ठिकाणाहून पसार झाली. यानंतर पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती बछड्यासोबत त्यांना घेऊन जंगलात गेल्याचे दिसून आले. यामुळे मात्र याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबतची घटना वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या बिबट्या लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. अनेकांवर हल्ले देखील होत आहेत.