Brian Lara : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा एक धडाकेबाज खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने तुफान खेळी केली. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या. असे असताना विराटच्या एवढ्या धमाकेदार कामगिरीनंतरही तो स्वार्थी असल्याची टीका काही महाभागांनी केली.
यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा विद्यमान निर्देशक मोहम्मद हाफिजचाही समावेश आहे. यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
दरम्यान, मोहम्मद हाफिजने एक वादग्रस्त विधान केले होते. “मला विराटच्या फलंदाजीमध्ये स्वार्थीपणा दिसून येतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मला तिसऱ्यांदा असं वाटलं. 49 व्या ओव्हरमध्ये तो स्वत:चं शतक पूर्ण करण्यासाठी एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता.
त्याने संघाला प्राधान्य दिलं नाही, असं हाफिज एका कार्यक्रमामध्ये म्हणाला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती. यावर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने प्रतिक्रिया नोंदवली आहे. तो म्हणाला, जे लोक विराटला स्वार्थी म्हणत आहेत, त्याच्याबद्दल या असल्या नको त्या गोष्टी बोलत आहेत त्यांना विराटबद्दल ईर्षा वाटते.
ते विराटवर जळतात. माझ्या करिअरमध्येही मी अशा प्रसंगांना सामोरे गेलो आहे. अशी काही आम्ही केलेल्या रन्समुळे कायम द्वेषाने जळत असतात, असेही म्हणत त्याने चांगलेच सुनावले आहे. तो म्हणाला क्रिकेटसंदर्भातील तर्क वापरत नाही त्यांना सांगू इच्छितो की 20 शतकं फार मोठी गोष्ट आहे.
अनेकांना संपूर्ण करिअरमध्ये 20 शतकं झळकावता येत नाहीत. विराट हे करु शकतो असं म्हणणं फारच धाडसाचं ठरेल. वय कोणासाठी थांबत नाही. विराट अनेक विक्रम मोडेल, असेही लाराने म्हटले आहे.