एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी 10 वर्षांपूर्वी लग्न केले होते.
आता त्यांना 2 मुलं आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब इतर कुटुंबीयांप्रमाणे नाही. लिंडसे आणि कॅड हे नात्याने एकमेकांचे भाऊ-बहिण लागतात. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरे आहे. याबाबत लिंडसेने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.
यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांना त्यांचे नाते काही रुचले नाही. कुटुंबात अनेक रहस्य असतात. बाहेरच्या लोकांना ही रहस्य कळल्यास एकच खळबळ उडू शकते. यामुळे याबाबत कोणीही उघडपणे याबाबत बोलत किंवा सांगत नाही.
काही जण मात्र ही घरातील गोष्टी बाहेर सांगण्यास अजिबात घाबरत नाहीत. सोशल मीडियावरही त्यांचे अनुभव बिनधास्त मांडत असतात. आता याप्रकरणात असेच काहीसे झाले आहे. लिंडसे हिने सोशल मीडियावर म्हटले आहे की, मी आणि माझा पती आम्ही एकमेकांचे सावत्र भाऊ आहोत.
आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडून काहीच चुक केली नाही. आम्ही आधीपासून भाऊ-बहिण नाहीयेत. आम्ही कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो. जेव्हा मी 14 वर्षांची होती तेव्हा माझ्या खिडकीत मी एका मुलाला पाहिले होते. भाई- बहिण व्हायच्या आधीच ते डेट करु लागले होते. तसेच आमच्या आई- वडिलांनी आधी लग्न नव्हते केले.
त्यांच्या आधीच आम्ही लग्न केले होते. जर आम्ही नसतो तर त्यांनी कधीच लग्न केले नसते. असेही तिने म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. नंतर माझी आई आणि माझे वडिल डेट करायला लागले. कॅड परत आल्यानंतर दोन आठवड्यातच आम्ही लग्न केले.
आमच्या लग्नानंतर माहिती झाल्यानंतरही एक वर्षांनंतर आमच्या आई-वडिलांनी लग्न केले. अस काहीसं आमच्या बाबतीत घडले आहे. अनेकजण यावरून आम्हाला टोमणे मारतात, पण आम्हाला याचा काही फरक पडत नाही.